101 तासांमध्ये केली 2100 कपड्यांना इस्त्री
101 तासांमध्ये 2100 कपड्यांना इस्त्री करण्याचा विक्रम चेन्नईमध्ये डॅनियल सुंदर यांनी केला आहे.
चेन्नई : 101 तासांमध्ये 2100 कपड्यांना इस्त्री करण्याचा विक्रम चेन्नईमध्ये डॅनियल सुंदर यांनी केला आहे. गिनीज बुकामध्ये या विक्रमाची नोंद झालेली नसली तरी याआधीचा विक्रम सुंदर यांनी तोडला आहे.
याआधी इंग्लंडच्या गॅरेथ सॅन्डर्स यांच्या नावावर हा विक्रम होता. सॅन्डर्स यांनी सलग 100 तास 2000 कपड्यांना इस्त्री केली होती. ऑस्ट्रेलियाच्या जेनेट हेस्टिंग्स यांनीही हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला होता. हेस्टिंग्स यांना मात्र फक्त 80 तासच इस्त्री करता आली होती.