नवी दिल्ली : सर्व प्रेक्षकांना मेरी ख्रिसमस..!  देशभरात ख्रिसमसचा उत्साह आहे. देश-विदेशातील चर्चना यावेळी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यरात्री चर्चमध्ये पवित्र मिस्सा पार पडला. वेटीकन सिटीतही विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोप फ्रान्सिस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर गोव्यासह संपूर्ण देशात ख्रिसमसचा उत्साह पाहयला मिळाला. 


ख्रिसमस निमित्ताने सँटा क्लॉज लहानग्यांना गिफ्ट वाटताना दिसत होते. या सणानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रपतींनी प्रभू येशूने सांगितलेल्या मानवतेच्या मार्गावर आपल्याला प्रेरीत होऊन जाण्याची गरज असल्याचं सांगितलं.