`खडसेंबाबत मुख्यमंत्री ठरवतील`
दाऊद कॉल प्रकरण, पुण्यातली जमीन खरेदी आणि गजानन पाटील लाच प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत.
नवी दिल्ली: दाऊद कॉल प्रकरण, पुण्यातली जमीन खरेदी आणि गजानन पाटील लाच प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत. पण भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खडसेंची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
खडसेंवरील आरोपांबाबत भाजपचे पक्षश्रेष्ठी गंभीर असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसेंबद्दल काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवतील, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामात मी हस्तक्षेप करत नाही, महाराष्ट्र सरकारनं चौकशी सुरु केली आहे, असंही शहा म्हणाले आहेत.