मुख्यमंत्र्यांनी केले तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.
अमरावती : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.
स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती व्हावी यासाठीच्या नवसपूर्तीसाठी त्यांनी हे दान केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या नवसपूर्तीसाठी के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी पैशाचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे.
यामुळे के. चंद्रशेखर राव यांचं हे दान वादात अडकण्याची चिन्हं आहेत, असे असतानाही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांसाठी प्रार्थना केल्याचं यावेळी चंद्रशेखर राव यांनी सांगितले.