नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. सत्तेत असलेले पीडीपी-भाजपा युतीमध्येही तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कश्मीरमध्ये हिंसेच्या ताजा घटना समोर येत आहेत. यानंतर मुख्यमंत्री महबूबा यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. महबूबा पंतप्रधानांना भेटून सध्याची स्थिती आणि पुढे काय पाऊलं उचलावी याबाबत चर्चा करु शकतात.


मोठ्या प्रमाणात होणारी दगडफेक यावेळची सर्वात मोठी समस्या आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत श्रीनगर लोकसभा निवडणुकीबाबत ही चर्चा होऊ शकते. त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. याचा परिणाम मतदानावर ही झाला. या निवडणुकीत पीडीपीला पराभव स्विकारावा लागला. पीडीपी आणि भाजपमध्ये दगडफेक करणाऱ्या लोकांशी सामना करण्याच्या मुद्द्यावर मतभेद आहेत.