नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत युतीच्या शोधात
एका इंग्रजी वृत्तपत्राने खुलासा केला आहे की, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनाइटेडचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत युती करु शकतात. नितीश कुमार यांना आता असं वाटतं आहे की, लालूंसोबत युती ही सरकारच्या प्रतिमेला नुकसानदायक ठरत आहे.
नवी दिल्ली : एका इंग्रजी वृत्तपत्राने खुलासा केला आहे की, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनाइटेडचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत युती करु शकतात. नितीश कुमार यांना आता असं वाटतं आहे की, लालूंसोबत युती ही सरकारच्या प्रतिमेला नुकसानदायक ठरत आहे.
संडे गार्जियनने दिलेल्या बातमीनुसार नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षासोबत युतीबाबतच्या शक्यतांना तपासत आहेत. यासाट त्यांनी चर्चा देखील करण्याची तयारी दाखवली आहे. एका वरिष्ठ जेडीयू नेत्याने म्हटलं की, दिल्लीत भाजप नेत्यांसोबत बैठकीनंतर ते पुन्हा युतीच्या शोधात आहेत. राज्यसभेत आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप देखील या युतीला मान्यता देतील अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपने नितीश कुमारांच्या प्रती सध्या नरमाईची भूमिका घेतली आहे.