लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ज्या नेत्यांची सत्ता आली त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नावाने किंवा इतर व्यक्तींच्या नावाने अनेक योजना चालू केल्या. उत्तर प्रदेशमध्ये आता योगी सरकार आल्यानंतर त्याचा प्रभाव मागच्या सरकारच्या योजनांवर होताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार आता मागील काही योजनांची चौकशी करणार आहे. अनेक योजनांमधील समाजवादी शब्द हटवण्यात येणार आहे. रेशनकार्डवरील अखिलेश यादव यांचा हटवण्यात येणार आहे.


१. राज्य सरकारच्या सर्व अँब्युलंसवरील समाजवादी शब्द हटवला जाणार आहे. 


२. अखिलेश यांचे फोटो असलेले रेशन कार्ड परत घेतले जाणार आहेत.


३. वृद्धासांठी असलेला समाजवादी श्रवण यात्रा फक्त आता श्रवण यात्रेच्या नावाने ओळखली जाणार आहे.


४. डिंपल यादव यांची पोषण मिशन हे योजना बंद केली जाणार आहे.


५. सरकारी शाळेतील बँगावरुन अखिलेश यादव यांचे फोटो हटवले जाणार आहेत.
 
६. शिया आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे माजी मंत्री आजम खान यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले गेले आहेत त्याची चौकशी केली जाणार आहे.


७. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश सरकारमधील रिवर फ्रंट घोटाळ्याची चौकशी सुरु केली आहे. ४५ दिवसात याचा रिपोर्ट मागितला आहे.