नवी दिल्ली : रेल्वेमध्ये बॅग, छत्री किंवा अनेक वस्तू प्रवासी विसरण्याच्या घटना घडत असतात. दिल्लीच्या मेट्रोमध्ये आठ महिन्यांमध्ये प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरुन गेलेल ४३ लाख रुपये मिळाले आहेत. तर 283 मोबाईल फोन आणि लॅपटॉप देखील मिळाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या लॉस्ट अँड फाऊंड डिपार्टमेंटने हे आकडे जारी केले आहेत. मेट्रोमध्ये विसरलेले किंवा हरवलेल्या पैशांची किंमत ही वाढलेली दिसत आहे. मागील वर्षात 18.80 लाख रुपये मिळाले होते ती या वर्षात 43 लाखांवर गेली आहे.


काय-काय मिळालं 


१. जवळपास रेल्वेमध्ये 43,18,155 रुपये मिळाले आहेत.


२. 26000 रुपयांपेक्षा अधिकचं परदेशी चलन


३. 40.85 लाखांचे बँक चेक आणि ड्राफ्ट


४. 79 लॅपटॉप, 283 मोबाईल फोन, 23 गोल्ड ज्वेलरी, 63 घड्याळ, ९ कॅमेरे आणि अनेक टॅबलेट फोन देखील मिळाले आहे.