काँग्रेसची ताकद चार आणे बंद करण्याएवढीच!
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला चांगलेच चिमटे काढले आहेत.
बेळगाव : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला चांगलेच चिमटे काढले आहेत. पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद केल्यामुळे काँग्रेस प्रश्न विचारत आहे. काँग्रेसनं चार आणे बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही प्रश्न विचारले का? काँग्रेसची हिंमत आणि ताकद चार आणे बंद करण्याएवढीच आहे, अशी टीका मोदींनी केली आहे.
2G स्कॅम, कोळसा घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा करणाऱ्यांना पाठीशी घालणारेही आज चार हजार रुपये घेण्यासाठी रांगेत उभे आहेत, असा टोला मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना लगावला आहे.