बारगड(ओडिसा) : गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही एनजीओ आणि काळा बाजार करणारे मला बदनाम करत आहेत आणि सरकारही अस्थिर करण्याचं षडयंत्र करत आहेत असं मोदी म्हणालेत. पण मी या सगळ्यांपुढे झुकणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला हे काही जणांना अजूनही पचत नाही, त्यामुळे त्यांच्याकडून मला खाली खेचण्याचं षडयंत्र सुरु आहे, असं प्रत्युत्तर मोदींनी दिलं आहे. 


काही एनजीओंना परदेशातून पैसे येतात, त्या एनजीओंना पैसे कुठून आणि कोणाकडून आले याचा हिशेब आम्ही विचारला, त्यामुळे ते सगळे एकत्र आले आणि 'मोदी मारो' 'मोदी मारो'च्या घोषणा द्यायला लागले, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला आहे.