जोधपूर : राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील कलिजंरा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील प्रेम संबंधामुळे प्रेमी युगुलाला निर्वस्त्र करुन गावात फिरवण्यात आलं. पोलिसांनी या संबंधात मुलीच्या वडिलांसह चार जणांना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवक-युवतीला निर्वस्त्र करुन गावात फिरवल्याचा व्हिडिओची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली. हा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने बनवला आहे. युवक- युवती 22 मार्चला घर सोडून गुजरातला निघून गेले होते. 


युवतीच्या परिवाराला काही दिवसांपूर्वी ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. गुजरातमधून त्या दोघांना पकडून गावात आणलं. गाववाल्यांनी आणि युवतीच्या कुटुंबियांनी युवक आणि युवतीला निर्वस्त्र करुन फिरवलं. याप्रकरणी २० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आहे.