चेन्नई : २०१६ चा शेवटचा महिना डिसेंबर तमिळनाडूसाठी अनेकदा वाईट ठरला आहे. ७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. ५ डिसेंबर, सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्नाद्रमुकचे संस्थापक, अभिनेता आणि मग राजकारणात आलेले माजी मुख्यमंत्री एम जी रामचन्द्रन यांचं निधन २४ डिसेंबर १९८७ ला झालं. यांनीच जयललिता यांना राजकारणात आणलं होतं.


भारताचे गवर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचं निधन २५ डिसेंबर १९७२ तर नेते ई वी रामासामी यांचं निधन २४ डिसेंबर १९७२ मध्ये झाला.


निसर्गाने देखील तमिळनाडूवर डिसेंबर महिन्यात कहर केला. २६ डिसेंबर २००४ मध्ये तमिळनाडूला त्सूनामीचा मोठा फटका बसला. २०१५ मध्ये देखील अतिवृष्टीमुळे चेन्नई, कांचीपुरम, कुड्डालोर, तिरूवल्लूर आणि तूतुकुडी यामध्ये मोठं नुकसान झालं. लोकं अजून त्यातून सावरलेले नाहीत.