गोव्यात भाजपला दे धक्का, विजयी उमेदवारांची लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल
गोवा राज्यात सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसलेला दिसत आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच विजयी उमेदवार आहेत.
मुंबई : देशातील पाच राज्यापैकी चार राज्यात भाजपची सत्ता येईल असे एक्झीट पोलने भाकित केले होते. यात गोवा राज्याचा समावेश होता. मात्र, सध्या सोशल मीडियावर गोव्यातील संभाव्य विजयी उमेदवारांची यादी जोरदार व्हायरल होत आहे. यात सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसलेला दिसत आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच विजयी उमेदवार आहेत.
गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार चुरस होईल आणि त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता एक्झीट पोलमध्ये वर्तविण्यात आली होती. भाजप मोठा पक्ष असेल असेही भाकित करण्यात आले आहे. मात्र, सोशल मीडियावर गोव्यातील विजयी उमेदवारांची लिस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये केवळ भाजपला 6 जागा मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुन्हा गोव्यात विजयाचे खाते खोलल्याचे दिसत आहे. तर काँग्रेसने पुन्हा जोरदार मुसंडी मारल्याचे या व्हायरल होणाऱ्या यादीवरुन दिसत आहे. तर पहिल्यांदा महाआघाडी झालेल्या मगोवा पक्षाला चांगली संधी मिळाल्याचे दिसत आहे.
पाहा विजयी उमेदवांची ही यादी