नवी दिल्ली : ऐन दिवाळीच्या तोंडावर उत्तर दिल्लीच्या नवा बाजार भागात मंगळवारी फटाक्यांचा स्फोट झाला. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे, एका ज्युट बॅगमध्ये फटाके भरून घेऊन जाताना त्याला अचानक आग लागली. त्यानंतर, स्फोट झाला. बीडी किंवा जळती काडी पडल्यानं ही आग लागल्याची शंका व्यक्त केली जातेय. 


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अजूनही स्फोटाचं कारण समजलेलं नाही. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.  


या स्फोटाची दखल तत्काळ गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही घेतली. त्यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक वर्मा यांच्याशी याबद्दल चर्चा केली.