नवी दिल्ली : महिलांनो तुमच्या जाड्या आणि पोट सुटलेल्या पतीला तुम्ही जर रागाच्या भरात काही बोलाल तर सावधान! कारण, आपल्या पोट सुटलेल्या आणि स्थूल पतीला त्याच्या पत्नीने 'मोटा हाथी' म्हटल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने एका दाम्पत्याला घटस्फोट घेण्यास परवानगी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्थान टाइम्स'मध्ये आलेल्या वृत्तानुसार २२ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने हा घटस्फोट ग्राह्य मानला आहे. ही व्यक्ती स्थूल आणि लैंगिकदृष्ट्या अशक्त असल्याने त्याच्या पत्नीने त्याला क्रूरपणे वागवणे सुरू केले. त्याच्या पत्नीने त्याच्या या अर्जाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. 


'एका महिलेने तिच्या पतीला 'हत्ती', 'मोटा हत्ती' आणि 'मोटा एलिफंट' असे म्हणणे - जरी तो स्थूल असला तरी असे शब्द त्याचा स्वाभिमान दुखावू शकतात,' असे न्यायाधीश विपीन संघवी म्हणाले. 'जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही एकमेकांविरुद्ध केलेल्या प्रत्येक आरोपाचा हिशोब ठेवणे अपेक्षित नाही,' असं ते पुढे म्हणाले. 


या महिलेने तिच्या पतीच्या थोबाडीत लगावून त्याला घर सोडण्यास सांगितले, या तक्रारीचीही न्यायाधीशांनी दखल घेतली. तसेच 'पत्नीप्रति असलेली निष्ठा' सिद्ध करण्यासाठी या महिलेने आपल्याला आपली संपत्ती तिच्या नावे करण्यास सांगितल्याचा आरोपही या व्यक्तीने केला. ११ फेब्रुवारी २००५ साली या व्यक्तीने शारीरिक संबंधांची मागणी केली असता आपल्या पत्नीने आपल्या लैंगिक अवयवांवर मारझोड केल्याचा आरोपही या व्यक्तीने केला. 


'आपल्या पतीने केलेले आरोप हे खूप अस्पष्ट आणि अर्थहीन आहेत, त्यांना कोणत्याही सबळ पुराव्याचा किंवा विशिष्ट प्रसंगांचा आधार नसतानाही कौटुंबिक न्यायालयाने आपल्या पतीला घटस्फोट घेऊ दिला,' असे या महिलेने म्हटले होते. उच्च न्यायालयाने मात्र तिचा हा युक्तीवाद फेटाळून लावला. 


'महिलेने केलेले आरोप हे वैवाहिक जीवनातील नेहमीचे आरोप नसून हे गंभीर स्वरुपाचे वैवाहिक आरोप असल्याचे' उच्च न्यायालयाने पुढे म्हटले.