नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर बँक, एटीएम तसेच पोस्ट ऑफिसमध्ये नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. तसेच नोटांचा तुटवडाही जाणवतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या नोटांच्या तुटवड्यामुळे एका व्यक्तीला बँकेकडून तब्बल 20 हजार रुपयांचे 10 रुपयांची नाणी देण्यात आली. इम्तियाज आलम असे या व्यक्तीचे नाव आहे.


जेव्हा कॅश संपली तेव्हा बँकेच्या मॅनेजरने 10 रुपयांचे कॉईन घेणार का असे विचारले असता तेव्हा रांगेत उभे राहण्यापेक्षा कॉईन घेणे सोयीचे वाटल्याने मी नाणी घेतली, असे इम्तियाज यांनी सांगितले.