नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या बंद करण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाला 'मोठं संकट' अशा शब्दांत संबोधलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमोहन सिंग यांनी इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू'मध्ये एक कॉलम लिहून नोटबंदीच्या निर्णयावर सरकारवर टीका केलीय. नोटाबंदीचा निर्णय हा मोदी सरकारचा घाईत घेतलेला निर्णय आहे... या निर्णयामुळे सामान्य माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. या योजनेच्या घोषणेनं १०० करोडहून अधिक भारतियांचा आत्मविश्वास धुळीस मिळवलाय. या निर्णयानं पंतप्रधानांनी लाखो भारतीयांना भारत सरकारमध्ये आपली आणि आपल्या धनाच्या सुरक्षेविषयी असलेला विश्वास पुसून टाकलाय. मोदी सरकारचा हा विचार चुकीचा आहे. सगळी कॅश काळंधनात आणि सगळं काळधन कॅशमध्ये उपलब्ध आहे... ही मान्यताच चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलंय.


'भारतातली कामगार लोकसंख्येचा जवळपास ९० टक्के भाग अजूनही रोख स्वरुपात मेहताना घेतो. यात शेकडो शेतीशी निगडीत कामगार, निर्माण क्षेत्रातील लोक आणि इतर सामील आहेत. या निर्णयाचा जीडीपी ग्रोथ रेट आणि नव्या नोकऱ्या निर्माण होण्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. माझ्या मतानुसार, एक देश म्हणून येत्या महिन्यांत कठिण वेळेसाठी आपल्याला स्वत:ला तयार ठेवावं लागेल' असं त्यांनी म्हटलंय.


परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यामागची भावना नकली नोटा, काळं धन आणि भ्रष्टाचाराशी लढा देणं असेल तर ते प्रशंसनीय असल्याचंही मनमोहन सिंग यांनी म्हटलंय.