५०० रुपयांच्या नोटांची छपाई तिपटीने वाढली
देशातील नोटांचा तुटवडा पाहता नाशिकमधील करंसी नोट प्रेसमध्ये रोज छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या तिपटीने वाढलीये.
नवी दिल्ली : देशातील नोटांचा तुटवडा पाहता नाशिकमधील करंसी नोट प्रेसमध्ये रोज छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या तिपटीने वाढलीये.
सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही नव्या ५०० रुपयांच्या नव्या नोटांच्या छपाईचे प्रमाण वाढवलेय. नोव्हेंबरमध्ये जिथे दिवसाला ३५ लाख नोटा छापल्या जात होत्या त्यांचे प्रमाण एक कोटींवर गेलेय.
दररोज एक कोटी ९० लाख रुपयांच्या नोटा छापल्या जातायत. त्यात एक कोटींच्या नोटा ५०० रुपयांच्या आहेत. अन्य नोटांमध्ये १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटा छापल्या जातायत. नाशिक प्रेसमध्ये २०००च्या नोटा छापल्या जात नाहीत.
नोटाबंदीनंतर शुक्रवारी नाशिक प्रेसमधून मोठ्या प्रमाणात नोटा पाठवण्यात आल्या होत्या. येथून आरबीआयकडे तब्बल ४ कोटी ३० लाख मिलियन नोटा पाठवण्यात आल्यात. यात १ कोटी १० लाख नोटा ५०० रुपयांच्या होत्या.
नोटाबंदीनंतर पहिल्यांदा ११ नोव्हेंबरला नाशिक प्रेसने रिझर्व्ह बँकेला ५०० रुपयांच्या ५० लाख नोटा पाठवल्या होत्या. गेल्या ४३ दिवसांत नाशिक प्रेसमधून रिझर्व्ह बँकेला वेगवेगळ्या ८२८ मिलियन नोटा पाठवण्यात आल्यात.