नवी दिल्ली : चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला असला तरी दिव्यांग व्यक्तींना यातून सूट देण्यात आली आहे. कोर्टानं या निर्णयामध्ये दुसरे कोणतेही बदल करण्यास नकार दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटगृहात ये-जा होऊ नये म्हणून दरवाजे बंद ठेवण्यात यावेत, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.


चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक करण्यात यावं, तसंच राष्ट्रगीतावेळी स्क्रीनवर तिरंगा लावण्यात यावा असे आदेश न्यायालयानं दिले होते. पण केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे आयोजकांनी या निर्णयामध्ये सवलत देण्यात यावी अशी मागणी केली होती.


या महोत्सवामध्ये जवळपास दीड हजार परदेशी पाहुणे येणार असल्यामुळे आयोजकांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानं मात्र यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. परदेशी पाहुण्यांना भारताचा सन्मान करण्यात काहीच आक्षेप नसेल, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे.