चेन्नई : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा नवे मुख्यमंत्री म्हणून पनीरसेल्वम यांनी स्वीकारलाय. जयललिता यांच्या संपत्तीचंही लवकरच विभाजन होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, जयललिता यांच्या संपत्तीत दोन जणांना हिस्सा मिळणार आहे. कोडानाडू आणि सीरवायी इथली संपत्ती जयललिता यांची मैत्रिण शशिकला यांना मिळणार आहे. तर पोएस गार्डनजवळची संपत्ती इलावरासी यांचा मुलगा विवेक याला मिळू शकते.


जयललिता यांची चल-अचल संपत्ती


एआयएडीएमकेच्या सुप्रिमो आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ११३.७३ कोटींची संपत्ती एप्रिल २०१५ रोजी घोषीत केली होती. ही त्याच्या गेल्या वर्षी जाहीर केलेल्या संपत्तीपेक्षा ३.४० कोटी कमी होती. जयललिता यांची चल संपत्ती एकूण ४१.६३ कोटी आहे आणि अचल संपत्ती सुमारे ७२.०९ कोटी आहे. एकूण संपत्ती ११३.७३ कोटी असल्याचे त्यांनी २०१५ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकी वेळी जाहीर केली होती. त्यांनी राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात ही संपत्ती जाहीर केली होती.