नवी दिल्ली : इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात गुजरात पोलिसांवर लावलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. २६/११ हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याने दिलेल्या जवाबाची पार्श्वभूमी या प्रकरणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅडव्होकेट एम एल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने उत्तर देताना हे म्हटले आहे. डेव्हिड हेडली याने इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाची दहशतवादी असल्याचे सांगितल्याने गुजरात पोलिसांवरील खोट्या एन्काऊंटरचे गुन्हे रद्द करावे, अशी मागणी या वकिलांनी केली होती. 


इशरत जहाँ प्रकरणात माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी खोटे प्रतिज्ञापत्रक दाखल केल्याने त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवावा, अशीही मागणी शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.