राजधानीला पुन्हा भूकंपाचे धक्के
राजधानी दिल्लीला भूकंपाचा धक्का जाणवलाय.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला भूकंपाचा धक्का जाणवलाय.
पहाटे साडेचारच्या सुमारास दिल्लीतील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिस्टर स्केल इतकी होती.
हरियाणातील रेवाडी जवळील बावल इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दिल्ली सोबत राजस्थानातील जयपूर आणि अलवरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवलेत.