नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव सिंहला एका बनावट कंपनीच्या माध्यमातून 49 कोटीच्या काळ्या पैशाला पांढरे करण्याच्या गुन्ह्यावरून अटक करण्यात आली आहे. ईडीचा संशय आहे की, अशा घटनांमध्ये बँकांमधील अनेक लोकांचा समावेश आहे. बँकांमध्ये मोठ्याप्रमाणावर हवाला मार्गाने पैसा जमा होत आहे. या घटनेमुळे देशातील दहा बँकांच्या पाच शाखांमध्ये आज तपासणी मोहिम चालू आहे. तसेच मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदनगर, लखनऊ, गोवा, चंढीगड, आणि जयपूर राज्यात देखील आज दिवसभर तपासणी सुरू होती.

तपासादरम्यान अशी माहिती समोर आली की, काही बँक खात्यांमध्ये पैसा जमा करण्यात आला आणि तो पैसा लगेच दूसऱ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आला आहे. तसेच काही सेल्स कंपन्या बँकांमधील पैसा एका खात्यातून दूसऱ्या कंपन्यांच्या खात्यात जमा करत आहेत. बँकांचा उपयोग मोठ्याप्रमाणावर हवाला कारभारासाठी होत आहे.

काही बँका हेतुपुरस्सर काही लोकांना कोणाच्याही ओळखपत्रावर ठरावीक रकमेच्या बाहेर पैसा देत आहे. ज्या बँक खात्यांतून मोठ्याप्रमाणात पैसाची देवाणघेवाण झाली अशी बँक खाती शोधण्यासाठी ईडी बँकेच्या लेखा परीक्षकांची मदत घेत आहे. तसेच ईडी बँकांचे सीसीटीव्ही फूटेज देखील जमा करत आहे जेणे करून तपास कार्य लवकर पूर्ण होण्यास मदत होईल.