नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. सोबतच निवडणूक आयोगाने हे साफ केलं आहे की, पैशांचा दुरुउपयोग कोणत्याही प्रकारे सहन केला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये उमेदवार फक्त २८ लाख रुपयेच खर्च करु शकणार आहेत. मणिपूर आणि गोवा या दोन राज्यांमध्ये उमेदवार २० लाखापर्यंत खर्च करु शकणार आहेत.


रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊट स्पीकरवर बंदी असणार आहे. उमेदवारांना बँक खातं उघडावे लागणार आहे. २० हजारापेक्षा अधिक रक्कम हे चेकच्या माध्यमातून द्यावी लागणार आहे.