नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीबाबत (PF) आता नव्या नियमात बदल करण्यात येणार आहेत. घर, वैद्यकीय उपचार आणि शिक्षणासाठी पूर्ण 'पीएफ' देण्याबाबत विचार केला जात आहे.


नवीन नियम ४ महिन्यानंतर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफच्या नव्या नियमांमुळे सरकारी कर्मचारी आणि खासगी नोकरदार वर्गाकडून केंद्र सरकारला रोष ओढवून घ्यावा लागला. त्यामुळे नवीन नियम लागू करण्याबाबत ४ महिन्यांच्या कालावधी वाढविण्यात आला आहे. केंद्राने प्रस्तावित नियम १ मे ऐवजी १ ऑगस्ट २०१६पासून लागू करण्याचे ठरविलेय. 


वैद्यकीय उपचारांसाठी पैसे


‘द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलेय. तसेच, काही नियम शिथिल करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यानुसार घर खरेदी, घर बांधकाम, स्वत:च्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी पीएफची पूर्ण रक्कम काढण्याची तरतूद करण्यात येणार आहे.


शिक्षणासाठी रक्कम मिळणार


तसेच शिक्षणासाठी पीएफची रक्कम काढता येणार आहे. यात मुलांच्या वैद्यकीय, दंतवैद्यक आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी आणि त्यांच्या लग्नकार्यासाठी ‘पीएफ'ची रक्कम काढण्याची तरतूद करण्यात येणार आहे.


 केंद्र किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत असणारे कर्मचारी तसेच अंशदायी भविष्य निधी किंवा वृद्धावस्था निर्वाह निधी (पेन्शन) योगदान करणार्‍यांना देखील ‘पीएफ‘मधील रक्कम काढणे शक्य होणार आहे. हा नवीन बदल ऑगस्टपासून आमलात येणार आहे.