नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुडन्यूज दिली आहे. निवृत्तीच्या दिवशीच मिळणार आता PFचे पैसे मिळणार आहेत. याचा लाभ ४ कोटी नोकरदारांना होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासगी क्षेत्रातील नोकरदारांना यापुढे भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड)ची रक्कम निवृत्तीच्या दिवशी किंवा त्याआधीच दिली जाईल.  पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पुनर्विलोकन बैठक झाली. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनाने (ईपीएफओ)  आवश्यक उपाययोजनेची कार्यवाही सुरू केली आहे. 


या बैठकीनंतर सर्व कार्यालयांना पत्रक पाठवले आहे, अशी माहिती केंद्रीय भविष्य निधीचे आयुक्त डॉ. व्ही. पी. जॉय यांनी दिली. खासगी कंपन्यांमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी ३ महिने अगोदरच तयार करण्यात यावी. त्यामुळे निवृत्तीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी पीएफचे पैसे मिळतील.


कंपनीच्या संचालकांनी पीएफमध्ये कंपनीच्या वाट्याची पूर्ण वर्गणी महिनाभर आधीच जमा करावी आणि त्याची पूर्वकल्पना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली द्यावी, असे त्यात म्हटले आहे.