नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम काढू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. काही कारणांमुळे पीएफ खात्यातील रक्कम काढू घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आणि अर्जाची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यासाठी बराच अवधी लोगतो. आता यापुढे ही रक्कम दहा दिवसांमध्ये खात्यात जमा होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफ खात्यातील रक्कम याआधी २० दिवसांच्या कालावधीत जमा होत होती. काही वेळा जास्तीचा वेळ लागत होता. पण कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाने नवी सनद तयार केली आहे. त्यानुसार अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी मंगळवारी ही सनद औपचारिकपणे जाहीर केली.


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाने ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी ‘ई-कोर्ट’ मॅनेजमेंट सिस्टिमही लागू केली आहे. यामध्ये कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने आपली कागदपत्रे, पुरावे व्यवस्थापनाकडे सादर करू शकणार आहेत.


ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यामुळे पीएफ व्यवस्थापनाच्या कारभारात पारदर्शकता येईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीही कमी होतील. कामाचा निपटारा वेगाने होईल. त्याचबरोबर कार्यक्षमताही वाढू शकेल, असे बंडारू दत्तात्रय म्हणाले.