नवी दिल्ली : एस्सेल ग्रुप आपलं 90 वं वर्ष साजरं करत आहे. या निमित्तानं आज दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनमानसात विश्वासाचं अढळ स्थान निर्माण केलेल्या एस्सेल ग्रुपच्या आतापर्यंतच्या गौरवपूर्ण वाटचालीचा आढावा या कार्यक्रमातून घेण्यात आला. एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा हे या विशेष कार्यक्रमाचे आमंत्रक आहेत. 


या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती आहे. याखेरीज अनेक मंत्रीगण, तसंच विविध क्षेत्रातले मान्यवरही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत.