धक्कादायक : पती वेळ देत नव्हता म्हणून मुलाच्या कोचसोबत ठेवले अनैतिक संबंध
महिलेने नात्याच्या सर्व सीमा ओलांडल्या.
नवी दिल्ली : नोएडा येथे राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजीनियर आपल्या कामात ऐवढा व्यस्त होता की त्याला त्याच्या पत्नीला देखील वेळ देता येत नव्हता. अशा परिस्थित या महिलेने नात्याच्या सर्व सीमा ओलांडल्या.
महिलेला एक ७ वर्षाचा मुलगा देखील आहे. मुलगा हा स्केटींग शिकण्यासाठी उत्साही होता. त्यामुळे या आईने इंटरनेटवर मुलासाठी स्केटींग कोच शोधण्याचा प्रयत्न केला. मग या महिलेची ओळख एका खासगी शाळेच्या कोच सोबत झाली. यानंतर मग हा त्यांच्या मुलाला त्यांच्या घरी येऊन मुलाला ट्रेनिंग देण्यासाठी तयार झाला.
महिला आपल्या मुलाला घेऊन रोज सोसायटीच्या पार्कमध्ये येऊ लागली. यानंतर कोच आणि या महिलेमध्ये मैत्री झाली. दोघांनी एकमेकांचा नंबर एक्सचेंज केला. यानंतर दोघेही हॉटेलमध्ये ही भेटू लागले. यानंतर हा कोच महिलेच्या घरापर्यंत पोहोचला. अनेक तास दोघांमध्ये आता गप्पा रंगू लागल्या. यामधूनच दोघांमध्ये संबंध वाढले आणि ही महिला या कोचला स्वत:चं हद्य देऊन बसली.