नोएडा: फॅशन डिझायनर शिप्रा मलिक या बेपत्ता झाल्या होत्या. आधी हा प्रकार म्हणजे अपहरण असल्याचा पोलिसांचा अंदाज होता, पण हे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौटुंबिक वादामुळे शिप्रा या घर सोडून गेल्या होत्या. क्राईम पेट्रोल ही मालिका बघून त्यांनी घर सोडण्याचा प्लॅन केला, पण टीव्हीवर बातमी पाहिल्यानंतर त्या परत आल्या असा दावा पोलिसांनी केला आहे. 


गुडगावमधल्या एका मॉलमधून पोलिसांनी शिप्राला ताब्यात घेतलं.  शिप्रानं स्वत:च आम्हाला फोन करून मी गुडगावमध्ये असल्याचं सांगितलं, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. 


शिप्रा घरातून बाहेर पडल्यानंतर ती बँकेत गेली, बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये ती कैद झाली त्यामुळे पोलिसांना संशय आला, आणि या न झालेल्या अपहरण नाट्याचं गूढ उकललं.