नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वदेशी 'महिला कंडोम' मंगळवारी औपचारिक रित्या लॉन्च केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाइफकेअर लिमिटेडद्वारे 'वेलवेट' या नावानं हे गर्भनिरोधक राष्ट्रीय राजधानी दिल्लीत लॉन्च करण्यात आलं. दोन दिवसीय राष्ट्रीय कुटुंब नियोजन शिखर संमेलनात हा कार्यक्रम पार पडला. 


महिलांना सुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसंच गर्भनिरोधक म्हणून या कंडोमचा वापर होईल. एचआयव्ही / एडसपासून महिला स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकतील. महिलांना सशक्त बनवण्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल असल्याचं नड्डा यांनी यावेळी म्हटलंय. प्राकृतिक रबर लेटेक्स आधारित हे महिला कंडोम आहे.


विश्व स्वास्थ्य संघटना (डब्ल्यूएचओ) नंही 'वेलवेट'ला नुकतीच मान्यता दिलीय.