अजमेर : एखाद्या महिलेच्या गर्भातूनच भ्रूण गायब झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंही नसेल? पण, असं घडलंय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या अजमेरमध्ये एक अशीच घटना घडलीय. एका महिलेच्या गर्भातून तिचा नऊ महिन्यांचा गर्भ अचानक गायब झाला. 


मिळालेल्या माहितीनुसार, अलवर गेटजवळ राहणारे मोनू गहलोत यांच्या गर्भवती पत्नीची - मंजू यांची तब्येत अचानक बिघडली. गंभीर अवस्थेत त्यांना जवाहरलाल नेहरू हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं... परंतु, हॉस्पीटलनं मंजू यांना मृत घोषित केलं. 


कुटुंबीयांनी दबाव आणल्यानंतर मंजू यांचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली. मंजू यांच्या गर्भात कोणतंही मूल आढळलं नसल्याचं पोस्टमॉर्टेममध्ये सांगण्यात आलं. मात्र, ममता कार्डावर मात्र मंजू यांना गर्भवती सांगत त्यांची डिलिव्हरी डेट 27 ऑगस्ट 2016 नमूद करण्यात आली होती. 


मंजू या गर्भवती नव्हत्या तर त्यांच्या गर्भाशयात गाठ होती, त्यामुळेच त्यांचं पोट फुगल्याचं दिसून येत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय तर कुटुंबियांना मात्र अजूनही या घटनेवर विश्वास ठेवणं कठिण जातंय.