संसदेच्या सत्रानंतर खासदारांचा `हा` सिनेमा पाहण्याचा प्लान...
लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा `दंगल` हा सिनेमा पाहायला जाणार आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा पाहायला जाणार आहेत.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी 'महिला सशक्तीकरणा'चा संदेश देण्यासाठी हा निर्णय घेतलाय. लोकसभेचे अधिकारी अनुप मिश्रा यांनी ही माहिती दिलीय. लोकसभा सेक्रेटेरिएटच्या वेल्फेअर डिपार्टमेंटनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय.
राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांसाठी बालयोगी ऑडिटोरिअममध्ये हा सिनेमा पाहणार आहेत. यासाठी खासदारांनी आपापल्या पत्नींनाही घेऊन येण्याचा आग्रह सुमित्रा महाजन यांनी केलाय.
'दंगल' हा सिनेमा हरियाणाचे कुस्तीपटून महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता - बबिता यांच्या कामगिरीवर आधारीत आहे.