नवी दिल्ली : नोटबंदीच्या निर्णयानंतर काही जणांकडून काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंटचा वापर होत आहे. ज्या लोकांना काळ्यापैशाला पांढरे करायचे आहेत ते लोकांना अमिश दाखवून स्व;ताच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगितलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाप्रकारे गैरव्यवहारात सहभागी झालेले दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारनं दिला आहे. कामगार, कारागिर आणि गृहिणींना २.५ लाखापर्यंत रक्कम बॅंक अकांउटमध्ये जमा करता येऊ शकते तसेच  आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशावर  आयकर विभागाकडून कोणतीही चौकशी केली जाणार नाही, असं सरकारनं याआधीच सांगितलं आहे.


काही लोक आपला काळापैसा दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करत आहेत आणि मोबदल्यात लोकांना पैसे दिले जात आहेत. हा पैसा जनधन अकाउंटच्या साहाय्याने देखील पांढरा करण्याचे प्रकार चालू आहेत.


अशाप्रकारे घटना कुठे घडत असल्यास लगेच आयकरविभागाशी संपर्क साधावा आणि जनतेने भष्ट्राचार विरोधी मोहिम यशस्वी करण्यासाठी सरकारला मदत करावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.