पंतप्रधान मोदींबाबत असभ्य भाषेचा वापर, अमर सिंहाविरोधात गुन्हा दाखल
५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. तर विरोधी पक्षांकडून यावर टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतांना समाजवादी पक्षाचे खासदार अमर सिंह यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे. यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांच्यासह आणखी दोघांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. तर विरोधी पक्षांकडून यावर टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतांना समाजवादी पक्षाचे खासदार अमर सिंह यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे. यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांच्यासह आणखी दोघांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे प्रवक्ते आय.पी. सिंह यांनी आजमगढमधील कोतवाली येथे अमर सिंहांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आय. पी. सिंह यांच्या हाती एक व्हिडिओ लागला आहे. ज्यामध्ये एका हॉटेलजवळ अमर सिंह एका व्यक्तीसोबत आहेत. ज्यामध्ये नोटबंदीच्या निर्णयावरुन एक व्यक्ती नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत होती. त्यावेळेस बाजूला उभे असलेले अमर सिंह हसत असतांना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.