देशात उघडलं पहिलं `कंडोम` शोरुम
रुढी आणि परंपरांनी नटलेल्या भारत देशात जोरात कंडोम बोलणं हे देखील पाहायला मिळत नव्हतं. पण आधुनिक होत चाललेल्या भारतात कंडोमच्या जाहिराती देखील आता काही नवीन वाटत नाही.
गोवा : रुढी आणि परंपरांनी नटलेल्या भारत देशात जोरात कंडोम बोलणं हे देखील पाहायला मिळत नव्हतं. पण आधुनिक होत चाललेल्या भारतात कंडोमच्या जाहिराती देखील आता काही नवीन वाटत नाही.
भारतात पहिला कंडोम शोरुम उघडणं मात्र काहीसं आश्चर्यकारक आहे. गोवा मध्ये उघडण्यात आलेल्या या शोरूमला भेट देणाऱ्यांची संख्या ही भरपूर आहे. आश्चर्य म्हणजे भेट देणाऱ्यांमध्ये महिलाचं प्रमाण अधिक आहे.
देशात सेक्स विषयी जागरुकता व्हावी यासाठी हे शोरुम उघडण्यात आलं आहे. या शोरुमची खासियत म्हणजे तुम्ही सेक्स विषयी कोणतीही माहिती विचारा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. शोरुम मधील कर्मचाऱ्यांना सेक्सबाबत माहिती देण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आलं आहे.