नवी दिल्ली : 500 रुपयांच्या नव्या नोटांना बँक तसेच एटीएममध्ये येऊन दोन आठवडे होत नाहीत तोच बाजारात 500च्या दोन प्रकारच्या नोटा पाहायला मिळतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

500च्या नोटांमध्ये अनेक लहान फरक आहेत. तज्ञांच्या मते यामुळे केवळ नागरिकांमध्ये संभ्रमच निर्माण होणार नाही तर नकली नोटांनाही बढावा मिळेल. 


इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, दिल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीने 500च्या दोन वेगवेगळ्या नोटांतील फरक सांगितला. एका नोटेत गांधीजींच्या सावलीचा आकार मोठा आहे तसेच सीरियल नंबर, अशोक स्तंभ यांच्या आकारातही फरक असल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. तर गुरुग्राम येथे राहणारे रेहन शाह यांनी या दोन्ही नोटांच्या बाजूही लहानमोठ्या असल्याचे म्हटलेय. 


मुंबईतील एका व्यक्तीला 2000 रुपये सुट्टे केल्यानंतर 500च्या नव्या नोटा मिऴाल्या. या दोनही नोटांच्या रंगात फरक दिसल्याची माहिती या व्यक्तीने दिलीये.


दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रवक्ते अल्पना किल्लावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चुका छपाईतील असू शकतात. कारण सध्या फार दबाव आहे. मात्र लोक निशंकपणे या नोटा घेऊ शकतात अन्यथा तुम्ही आरबीआयकडे या नोटा परत करु शकता.