किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नेमणूक
![किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नेमणूक किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नेमणूक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/05/22/184361-316290-kiranbedibjp1.jpg?itok=xQMDgke3)
किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती
नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेटने केलेल्या शिफारशीवर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी माजी आणि पहिली महिला आयपीएस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या किरण बेदी यांना पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्त केलं आहे. किरण बेदी यांना मोदींनी त्यांच्या इमानदारीचं बक्षीस दिल्याची चर्चा आहे. या आधी भाजपने दिल्ली विधानसभा निवडणूक किरण बेदींच्या नेतृत्वात लढवली होती.
पक्षातील अतंर्गत कलहामुळे दिल्लीमध्ये भाजपला अपयश आलं. किरण बेदी यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला होता. पण पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा त्याच्यावर विश्वास होता. ५ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर मोदी कॅबिनेटने त्यांना पद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्त केलं.