भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार
भारत आणि फ्रान्सदरम्यान आज राफाएल जेट खरेदीचा करार होणार आहे. भारत फ्रान्सकडून 36 राफाएल जेटस खरेदी करणार आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी ही फायटर जेटस असणार आहेत.
नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्सदरम्यान आज राफाएल जेट खरेदीचा करार होणार आहे. भारत फ्रान्सकडून 36 राफाएल जेटस खरेदी करणार आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी ही फायटर जेटस असणार आहेत.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन यिव्हज् ली ड्रायन यांच्यामध्ये या जेटससाठी साडे सात अब्ज युरोंचा हा करार होणार आहे.
युपीए सरकारनं हाच करार फ्रान्सबरोबर केला होता. पण नरेंद्र मोदींनी हा करार रद्द करत हा नवा करार केलाय. या नव्या करारामध्ये पंच्याहत्तर कोटींची बचत होणार आहे. यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार आहे.