जयपूर : नोटबंदीनंतर राजस्थानमधील अलवरमध्ये एक घोटाळा समोर आला आहे. सव्वा पाच कोटीचा हा घोटाळा झाल्याचं बोललं जातंय. १९ नोव्हेंबरला पोलिसांनी ३ गाड्यांमधून १ कोटी ३२ लाख रुपयांसह १२ लोकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर हा घोटाळा समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलवर अरबन कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर दीपक कुमार तांतीने अटक केल्यानंतर चौकशीत याबाबत खुलासा केला आहे. एकूण ५.२५ कोटीचा घोटाळा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ही रक्कम काढली गेली पण याचा कोणताही पुरावा नाही.


एसबीबीजे बँकेतून हे पैसे काढल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मॅनेजरने सेल्फ चेकने 4.50 कोटी रुपये काढल्याचं मान्य केलं आहे. बँकेच्या काही कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश होता.