नवी दिल्ली : बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे संयुक्त निवदेन देण्याचा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्यांने मोदींना 'पाय उतार व्हा' असे म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी मोदी हसले आणि त्यानंतर शेख हसीनाही हसल्यात. त्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. शनिवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये भारत दौऱ्यावर असलेल्या शेख हसीना यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त निवेदन कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रम निवेदकाने पाय उत्तार होण्यास सांगितले त्यावेळी पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्यासह उपस्थितांना हसू आवरले नाही. 


दोन्ही नेत्यांची भाषणं जेव्हा संपली तेव्हा निवेदन करणारा अधिकारी म्हणाला की, 'आय रिक्वेस्ट द टू प्राईम मिनिस्टर टू स्टेप डाऊन'. त्यांना म्हणायचं होतं की दोन्ही नेत्यांनी मंचावरुन खाली उतरावं. पण इंग्लिशमध्ये 'स्टेप डाऊन'चा अर्थ पाय उत्तार व्हावे किंवा आपले पद सोडावे, असा होतो. 


हा व्हिडिओ पाहा, तुम्हीही हसाल...