फोटो : व्यापाऱ्याच्या मुलीचं ५०० करोड रुपये खर्चून केलेला हा विवाहसोहळा
खाण व्यावसायिक आणि माजी मंत्री बी. जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचा नुकताच भव्य अशा पॅलेस ग्राऊंडसमध्ये विवाहसोहळा पार पडला. हा विवाह सोहळा तब्बल पाच दिवस सुरू होता.
बंगळुरू : खाण व्यावसायिक आणि माजी मंत्री बी. जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचा नुकताच भव्य अशा पॅलेस ग्राऊंडसमध्ये विवाहसोहळा पार पडला. हा विवाह सोहळा तब्बल पाच दिवस सुरू होता.
देशातील अनेक जणांना सध्या ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानं अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. परंतु, हे लग्न मात्र मोठ्या थाटामाटात पार पडलं.
रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणीनं आंध्रप्रदेशच्या एका मोठ्या व्यापाऱ्याचा मुलगा राजीव रेड्डीशी विवाह केलाय. तिरुमला मंदिरातील पुजाऱ्यांनी हा विवाह सोहळा पार पाडला. लग्नासाठी हम्पीचे प्रसिद्ध विजय वित्थला मंदिर आणि तिरुमला तिरुपती मंदिरच्या प्रतिकृतींचे सेट बनवण्यात आले होते. सोबत वर आणि वधुच्या घरांच्याही प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या.
लग्नात सहभागी झालेल्या हजारो लोकांना गोडधोड पदार्थ आणि झाडांची रोपं देण्यात आली. या लग्नासाठी जवळपास ५० हजार लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
रेड्डी आणि कुटुंबीय सोनं आणि हिऱ्यांच्या आभूषणांनी राजेशाही पद्धतीनं तयार झाले होते.
लग्नासाठी वापरण्यात आलेली भांडी सोन्या आणि चांदीचे होते. संपूर्ण आयोजन स्थळावर एसी सुरू होता.
या लग्नासाठी कन्नड आणि तेलुगू सिनेजगतातील अनेक कलाकार उपस्थित होते.