नवी दिल्ली : भारतात पुरुषांच्या शरीरविक्रीचा धंदा मोठ्या तेजीत फैलावताना दिसतोय. दिल्ली, मुंबई, बंगळुरू यांसारख्या शहरांतील अनेक प्रमुख व्हीव्हीआयपी भागांत 'जिगोलो' या सोफिस्टिकेटेड नावाखाली हा धंदा सुरु असतो. या धंद्याला 'जिगोलो मार्केट' म्हटलं जातं. 


उच्चभ्रू भागांतील प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बाजारात उच्चभ्रू महिला आपल्या पसंतीचा पुरुष मिळवण्यासाठी वाट्टेल तेवढी रक्कम मोजण्यासाठी तयार असतात. दिल्लीच्या जिगोलो मार्केटमध्ये अनेक तरुण उघडरित्या आपल्या शरीराचा सौदा करत असतात.  


पिळदार शरीरयष्टीचा फायदा


जिगोलो बुक करण्याचं काम केवळ रस्त्यांवर नाही तर हाय-फाय क्लब, पब आणि कॉफी हाऊसमध्येही सुरू असतो. काही तासांसाठी जिगोलोची बुकींग २००० ते ३००० रुपयांत तर संपूर्ण रात्रीसाठी ८००० रुपयांपर्यंत होते. याशिवाय पिळदार शरीरयष्टी असेल तर अशा युवकांचे भाव आणखी वधारलेले दिसतात. 


गळ्यांतील पट्ट्यांवरून मागणी


देहाचा हा व्यापार रात्री १० वाजल्यापासून सकाळी ४ वाजेपर्यंत सुरू असतो. बहुतेकदा पॉश भागांत हे युवक रस्त्यांवर उभे असतात. गाड्या येतात... थांबतात... सौदा ठरतो... आणि जिगोलोला घेऊन गाडी सुरु होते. गळ्यांतील पट्ट्यांवर त्यांची मागणी ठरते. 


हातात लाल रुमाल 


मोठमोठ्या हॉटेलांमध्येही हा धंदा तेजीत सुरू असतो. पण, इथे मात्र गळ्यातील पट्टे नाही तर जिगोलोंच्या कपड्यांवरून त्यांना ओळखलं जातं. अनेक हॉटेलांमध्ये जिगोलोंच्या हातात लाल रुमाल, काळी पॅन्ट आणि सफेद शर्ट असतं.