जयपूर : तरुणाने आंघोळ करत असताना लपून पाहिल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात घडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना बुधवारी घडली. पीडित तरुणी घरातील बाथरुममध्ये आंघोळ करत होती. तेव्हा कोणीतरी पाहत असल्याचे तिला जाणवले. एक तरुण लपून हे सगळे पाहत असल्याचे बघून ती जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून पीडित तरुणीच्या घरातल्यांनी त्या मुलाला पकडले आणि चांगलाच दम भरला. 


दरम्यान, ही घटना मुलाच्या घरी कळताच आरोपी मुलाचे वडील  किशनलाल वैष्णव आणि भवन दास पिडित मुलीच्या घरी गेले आणि भांडायला लागले. भांडण वाढत हमरीतुमरीवर आले. घरातील वाद आपल्यामुळेच होत असल्याचा अपराधी भावनेतून मुलीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या करण्याच प्रयत्न केला. यात पीडित तरुणी ७० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. 


याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाचे वडील किशनलाल आणि भवनदास यांना अटक केलीये. तर आरोपी तरुण फरार आहे.