लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीने असं काही केलं की लोकं झाले हैराण
मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये एका पत्नीने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असं काही केलं की लोकांच्या भूवया उंचावल्या. सात जन्म सोबत राहिल असं लग्नात सांगणाऱ्या पत्नीने दुसऱ्याच दिवशी पतीला सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
छतरपूर : मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये एका पत्नीने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असं काही केलं की लोकांच्या भूवया उंचावल्या. सात जन्म सोबत राहिल असं लग्नात सांगणाऱ्या पत्नीने दुसऱ्याच दिवशी पतीला सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पतीने आणि काही लोकांनी मिळून नंतर त्या महिलेला पकडलं. छतरपूर जिल्ह्यातील सिंग्रामपूरमध्ये राहणाऱ्या छन्नू लाल शुक्ला हे अंपग आहे. त्यामुळ त्यांचं लग्न होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी एका दलाला दीड लाख रुपये देऊन मुलीला लग्नासाठी तयार केलं.
छन्नू लाल याने त्या तरुणीसोबत कोर्टात लग्न केलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी छन्नू लाल घरासाठी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेले. बाजारात पोहोचल्यानंतर शौचास जाण्याचा बहाना करुन त्या तरुणीने तेथून पळ काढला आणि बसमध्ये जाऊन बसली. पण बस सुरु होण्यापूर्वी छन्नू लाल बसमध्ये तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्यानंतर त्या युवतीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण काही लोकांच्या मदतीने त्याने त्या युवतीला पकडलं. त्यानंतर पोलीस स्थानकात त्याने तक्रार दिली. पोलिसांनी त्या युवती विरोधात तक्रार दाखल करुन तिला सध्या महिला संरक्षण केंद्रात ठेवलं आहे.