बंगळुरु : 31 डिसेंबरची रात्र रेजिडेंसी रोडवरील एका हॉटेलमधील कार्यक्रम संपल्यानंतर 2 बाउंसर्स सोबत जेव्हा एक व्यक्ती बाहेर पडले तेव्हा त्यांनी एका तरुणांच्या ग्रुपला संकटातून वाचवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्बास असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांनी 31 डिसेंबरच्या रात्री बंगळुरुमध्ये घडलेल्या त्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे. ते म्हणतात की, नवीन वर्षाच्या कार्यक्रमाचं एका हॉटेलमधून होस्टींग करुन बाहेर पडलो तेव्हा महिलांच्या ओरडण्याचा आवाज आला. रस्त्यावर काही तरुणी आपल्या पायातल्या चपला हातात घेऊन धावत असतांना दिसल्या. या महिला ब्रिग्रेड रोड जंक्शनकडून मेयो हॉलच्या दिशेने धावत होत्या. 25 ते 30 लोकांनी 5 तरुणी आणि 3 मुलांना घेरलं होतं. ते त्या ग्रुपमधील तरुणांना आणि तरुणींना शिव्या देत होते. त्यामधील अनेक लोकं हे मद्यधुंद अवस्थेत होते. मी लगेचच पुन्हा हॉटेलमध्ये गेलो आणि 2 बाऊंसर्सला सोबत घेऊऩ आलो. ज्यांनी मला माझ्या कारपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर आम्ही तिन्ही जण त्या घटनास्थळी पोहोचलो आणि त्यांची मदत केली.


मी जेव्हा ओरडलो की आम्ही पोलिसांना बोलावू तेव्हा ते लोकं आमच्याकडे रागाने पाहू लागले. जसे त्यांचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. जेव्हा दोन्ही बाऊंसर्स त्या गुंड्यांवर नजर ठेवून होते तेव्हा मी त्या तरुणींना वाचवलं. त्यांना त्यांच्या घरी जायचं होतं. मी त्यांना म्हटलं की मी कॅब बूक करुन त्यांना घरी पाठवतो. तेव्हा त्यांनी म्हटलं की त्यांनी कॅब बूक केली आहे. कॅब ही मेयो हॉलजवळ त्यांची वाट पाहत आहे. 


आम्ही जर त्या तरुणांची मदत नसती केली तर माहित नाही त्यांच्यासोबत काय झालं असतं. त्यासंपूर्ण रस्त्यावर एकही पोलीस नव्हता. बाकीचे लोकं फक्त तमाशा बघत होते. मी सुपरमॅन नाही आहे की सगळ्यांसोबत एकट्याने सामना केला असता. पण मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वाचवलं. असाच जर सगळ्यांनी विचार केला तर महिलांविरोधातील अपराध कमी होऊ शकतात.