पणजी : मार्च महिन्यामध्ये मुदत संपणाऱ्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम आत्ता जोरात वाजू लागलेत. सत्ताधारी भाजपने प्रचारात वेग घेतला असून काँग्रेसचे असंतुष्ट आमदारांना भाजपत घेण्याचे प्रयत्न जोरात सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या नाराज नेत्यांना भाजपमध्ये घेण्यात येत आहे. याला मोठ्या प्रमाणात यश ही आला आहे. गेल्या महिन्याभरात भाजपने काँग्रेसच्या दोघा आमदारांना भाजपात प्रवेश दिला आहे. यात कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर आणि दाभोळीचे आमदार माविन गुदिनो यांचा समावेश आहे.


दुसरीकडे कांग्रेसचे माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मगो पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे सध्यातरी काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे . स्थिर स्वच्छ सरकार आणि विकास या मुद्यांवर आपण भाजपत सहभागी होत असल्याचे मडकईकर यांनी सांगितले.