नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल आल्यानंतर भाजपने जल्लोष केला. भाजपने दोन राज्यांमध्ये मोठं यश संपादन केलं पण याचा परिणाम सोन्यांच्या भावावर देखील पाहायला मिळाला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव २५० रुपये प्रती तोळाने घसरले. तर चांदीचे  भाव ५०० रुपये प्रती किलोने घसरले.


सोन्याचे भाव बुधवारी २५० रुपयांनी घसरुन २८.६५० प्रती तोळा रुपये झाला. तर चांदी ५०० रुपयांनी घसरुन ३९,९७० रुपये प्रतीकिलो रुपये झाली. सोनं आणि चांदींच्या किंमतीत घसरण ही गुंतवणूकांच्या शेअर बाजारावर विश्वासामुळे झाला. मागच्या २ दिवसांपासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळते आहे. तर आज सेंसेक्समध्ये छोटीशी घसरण पाहायला मिळाली. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भावही वाढला आहे.