नवी दिल्ली : सोन्याची मागणी वाढू लागल्याने त्यांच्या किंमतीत आज पुन्हा वाढ पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात स्थानिक ज्वेलर्सच्या वाढत्या मागणी तसेच जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतामुळे सोन्याचे दर २५ रुपयांनी वाढले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या दरात २५ रुपयांची वाढ होत ते प्रतितोळा २८,५७५ रुपयांवर बंद झाले. जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये काल सोन्याच्या दरात ०.२४ टक्के वाढ पाहायला मिळाली. 


दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा २८,५७५ आणि २८,४२५ रुपयांवर बंद झाले. काल सोन्याच्या दरात १५० रुपयांची वाढ झाली होती.