सोने पुन्हा झाले स्वस्त, चांदीच्या दरातही घट
घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात गुरुवारी पुन्हा घसरण झालीये. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात ३५० रुपयांची घसरण झालीये.
नवी दिल्ली : घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात गुरुवारी पुन्हा घसरण झालीये. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात ३५० रुपयांची घसरण झालीये.
सोन्याचे दर आज प्रतितोळा २९ हजार रुपयांवर बंद झाले तर दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचे दर २०० रुपयांनी कमी होत प्रति किलो ४१, २५० रुपयांवर बंद झाले.
सिंगापूरमध्येही सोन्याचे दर ०.१२ टक्क्यांनी घसरुन १२४६.७० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. नवी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे २९,००० आणि २८,८५० रुपये प्रति ग्रॅम इतके राहिले.